Land Acquisition
sakal
माडसांगवी: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी गावाच्या शिवारातून जाणाऱ्या प्रस्तावित ६० मीटर रुंदीच्या रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात येथील शेतकऱ्यांतर्फे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, प्रभारी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनावणे यांना निवेदन देण्यात आले.