निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांच्या
राजीनाम्यासाठी मंगळवारी महामोर्चा
महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासह ‘एसआयआर’ची प्रक्रिया रद्द करावी किंवा त्यात सुधारणा करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखाची मदत द्यावी, आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश भालेराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी, मंगला पाटील, माजी अध्यक्ष अयाज मलिक, काँग्रेसचे श्याम तायडे, बाबा देशमुख, विजयकुमार कोसोदे आदी उपस्थित होते.
निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी संविधानाला पायदळी तुडवले असून, लोकशााहीचा मोठा अपमान केला आहे. एसआयआरच्या माध्यमातून अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. या हुकूमशााही वृत्तीला बसण्यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट एक लाखांची मदत द्यावी आदी मागण्यांसाठी हा महामोर्चा निघेल. महामोर्चात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संखयेने सहभागी होणार आहेत.
------