Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ ओबीसींचे माईल स्टोन, आमचे दैवत : महादेव जानकर

mahadev jankar
mahadev jankarsakal

Chhagan Bhujbal News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना धमकी येणे चुकीचे आहे. त्यांना धमक्या देऊ नका, ते योग्य नाही. भुजबळ हे आमचे दैवत असून, ओबीसी समाजाचे माईल स्टोन नेते आहेत.

त्यांना धमकी दिली तर बाकीचा समाज गप्प बसणार नाही. या भानगडीत पडू नका, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा माजी मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी (ता. १४) दिला. ( Mahadev Jankar statement about Chhagan Bhujbal nashik news )

जनस्वराज यात्रेच्या निमित्ताने जानकर हे नाशिक दौऱ्यावर आले. या वेळी त्यांनी श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यावर माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी भुजबळ यांना धमकी दिल्यास महागात पडेल, असा थेट इशारा दिला. भुजबळ यांना धमक्या देऊन काहीही होणार नाही, हे योग्य नाही.

कायद्याने आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर त्यांनी भाष्य केले. जनस्वराज्य यात्रा राज्यात अडीच महिन्यांपासून सुरू आहे. यात्रेला राज्यात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळेच पक्ष आम्हाला यानिमित्त साथ देत आहेत; परंतु राज्यात सध्या कोण बरोबर आहे व कोण विरोधात आहे, हे कळत नाही.

mahadev jankar
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मेसेज पाठवणारा मराठवाड्यातल्या 'या' जिल्ह्यातला?

धनगर आरक्षणावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या टिकेवर बोलताना ते म्हणाले, की झिरवाळ यांना असे बोलणे शोभत नाही. ते संविधानिक पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी संयमाने वक्तव्य केले पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहात, कोणत्याही जातीत मतभेद न करता सर्वांना आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

भाजप हा काँग्रेससारखाच पक्ष

मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आजपर्यंत खेळ केला आहे. भारतीय जनता पक्षही आता त्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. भाजप हा काँग्रेससारखा वागत आहे. आरक्षणासाठी भाजपने केंद्रात विधेयक मंजूर केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

mahadev jankar
Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षण ही गोष्ट एकटा मी अडवू शकतो का? भुजबळांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com