Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मेसेज पाठवणारा मराठवाड्यातल्या 'या' जिल्ह्यातला?

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मेसेज पाठवणारा मराठवाड्यातल्या 'या' जिल्ह्यातला?

Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शुक्रवारी पुन्हा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी धमकीसंबंधीची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे. (Chhagan Bhujbal Death threat to minister again sender of the message is from parbhani)

छगन भुजबळ हे येवल्याच्या दौऱ्यावर निघाले असताना दोन सहाय्यकांना मोबाईलवरुन संपर्क करण्यात आला होता. प्रत्येकवेळी ‘भुजबळ साहेबांशी बोलायचे आहे', असे सांगितले जात होते. त्याचबरोबर भुजबळ यांच्याही मोबाईलवर संपर्क केला गेला.

अखेर मोबाईल क्रमांक ९०७५०१५८७५ या क्रमांकावरून भुजबळ यांच्या मोबाईलच्या व्हॉटस-ॲपवर मेसेज पाठवण्यात आला. ‘तू जास्त दिवस राहणार नाही, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही', अशी धमकी दिल्याचे खैरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मेसेज पाठवणारा मराठवाड्यातल्या 'या' जिल्ह्यातला?
सणोत्सवांच्या काळात प्रवाशांना दिलासा! मध्य रेल्वेच्या १०४ विशेष गाड्या धावणार; कुठे किती फेऱ्या?

अंबड पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मोबाईल ‘ट्रेस' केला असून धमकीचा मेसेज पाठवणारा परभणी भागातील असल्याचे आढळून आले. त्यानुसार संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पोलिस रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, छगन भुजबळ यांना गेल्या पाच वर्षात देण्यात आलेली ही पाचवी धमकी आहे. ऑक्टोंबर २०१८ मध्ये धमकीचे तीन पानी पत्र भुजबळ यांना पाठवण्यात आले होते. जुलै २०२३ मध्ये भुजबळ हे पुण्यात असताना कोल्हापूरच्या तरुणाने धमकी दिली होती. पुढे ऑगस्टमध्ये मखमलाबादच्या शाळेतील भाषणानंतर धमकीचे दोन प्रकार घडले होते.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; मेसेज पाठवणारा मराठवाड्यातल्या 'या' जिल्ह्यातला?
Video : ''एका ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी २५ पक्ष एकत्र आले'', OBC परिषदेतून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com