Education
sakal
नाशिक: राज्य शासनाच्या ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर ‘भारतीय ज्ञानप्रणाली–सामान्य’ हा पहिला ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मातृभाषा मराठीत उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ‘महाज्ञानदीप’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.