महानिर्मितीचे औष्णिकसह जलविद्युत जोमात; 8300 मेगा वॅट वीजनिर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MAHAGENCO

महानिर्मितीचे औष्णिकसह जलविद्युत जोमात; 8300 मेगा वॅट वीजनिर्मिती

एकलहरे (जि. नाशिक) : महानिर्मितीने नुकताच 27 पैकी 27 संच सुरू ठेवण्याचा विक्रम केला होता पण दोन दिवसांपूर्वी महानिर्मितीचे 3 संच बंद पडले तरी निर्मितीत बाधा न येऊ देता 8300 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती. राज्यासह देशात कोळसा तुटवड्याचे दुर्भिक्ष काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसताना , रोज पुरेल एवढा किंवा काही वीज केंद्रात एक दोन दिवस पुरेल एवढा कोळसा शिल्लक रहात असल्याने वीज निर्मिती काहीअंशी धोक्यात आली आहे . परंतु महानिर्मितीला (Mahanirmiti) भर उन्हाळ्यातही जलविद्युत (Hydropower) केंद्रांनी उत्तम साथ दिल्याने महानिर्मिती 8 ते 8500 मेगा वॅट वीज निर्मितीत सातत्य ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. (Mahanirmiti Hydroelectricity with thermal power generation 8300 MW power generation nashik news)

महानिर्मितीचे परळी येथील संच क्र 6 (क्षमता 250 मे वॅ)चंद्रपूर संच 8 व भुसावळ संच क्र 4 हे बॉयलर ट्यूब लिकेज मुळे बंद असतानाही आज मध्यरात्री महानिर्मितीच्या औष्णिक ची निर्मिती 6295 मेगा वॅट इतकी होती तर जलविद्युत च्या कोयना 1 -403,कोयना 3-234, कोयना 4-976, के डी पी एच 30 व घाटघर येथून 121 अशी एकूण 1726 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती. तर खासगीचे जिंदाल 833, अदानी 2720, रतन इंडिया 1079 , एस डब्लू पी जि एल 355 धाडीवाल 219 व इतर , सोलर, पवनचक्की या अपारंपरिक स्तोत्र मिळून खासगीची 7003 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू होती.

राज्याची मागणी 25088 होती तर सर्व स्तोत्रातून 16756 मेगा वॅट इतकी होती तर सेंट्रल मधून हिस्स्यापेक्षा 300 ते 500 मेगा वॅट 8 रुपये दराने खरेदी केली जात होती.भुसावळ व चंद्रपूर येथील 2 संचांचा 65 तास ते 72 तास अनुक्रमे काम हाती घेण्यात आले आहे. हे संच सुरू झाल्यावर 9 हजाराचा आकडा महानिर्मिती पार पाडेल यात शंका नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते किमान 8 ते 15 दिवसांचा कोळसा स्टॉक असला पाहिजे. सध्या जसे रोजंदारी कामगार काम करतो व खातो तस जसजसा कोळसा उपलब्ध होईल तसतसे सर्व केंद्रांना वाटप केला जात आहे.

आयातीत कोळसा मागवून त्यात देशी कोळसा ब्लेंड करून वापरला तर निर्मितीत निश्चित वाढ होईल तसेच पावसाळा तोंडावर असल्याने किमान स्टॉक सर्व वीज केंद्रात रहाणे आवश्यक आहे व त्यादृष्टीने उपाययोजना हव्यात.

"कोळसा नियोजन करून वीजनिर्मिती सातत्य ठेवण्यात येत आहे. तर 3 संच बंद आहेत ते 5 तारखेला कार्यान्वित होतील. वीज निर्मिती सातत्य ठेवण्यात सर्व अधिकारी , अभियंता, कामगार व कंत्राटी कामगार यांचे योगदान आहे."

- चंद्रकांत थोटवे , (संचालक संचलन)