
नाशिक : मनसे कार्यालय पोलिसांच्या घेऱ्यात
जुने नाशिक : ईदगाह मैदान समोर मनसे (MNS) पक्षाचे मुख्य कार्यालय आहे. सरकारवाडा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होते.
मंगळवारी कुठलेही आंदोलन करू नये, अशा सूचना मनसैनिकांना देण्यात आल्या होत्या. असे असले तरी पोलिसांनी सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेता सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी खबरदारी घेत ईदगाह मैदान समोरील मनसे मुख्यालय कार्यालयास पोलिस फेऱ्यात घेतले होते.
हेही वाचा: राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक; हिंदु महासंघाची टीका
स्वतः तसेच अन्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिवसभर या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त होते. प्रसारमाध्यमदेखील मनसे (MNS) कार्यालयावर नजर टिकवून होते. विविध प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी बराच वेळ या ठिकाणी तळ ठोकून होते. पोलिसांचे नियोजन बघता कुठल्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता, शांततेत ईदची नमाज झाली.
हेही वाचा: MNS leaders; आरती झाली अन् पोलिसांनी मनसैनिकांना घेतलं ताब्यात
Web Title: Strict Police Security Outside The Nashik Mns Office
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..