Dinkar Patil
Dinkar Patilesakal

Mahanubhav Sammelan: गुजरातमध्ये 20 डिसेंबरपासून महानुभाव संमेलन : दिनकर पाटील

Published on

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव संमेलन तथा श्रीमद्भगवद्गीता जयंती महोत्सव यंदा गुजरातमध्ये साजरा होणार आहे.

२० ते २२ डिसेंबर यादरम्यान होणाऱ्या या संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (Mahanubhav Sammelan in Gujarat from December 20 Dinkar Patil nashik)

श्री. पाटील म्हणाले, की गेल्या वर्षी शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य असे अखिल भारतीय महानुभाव संमेलन झाले होते.

यंदा अखिल भारतीय महानुभाव संमेलन व श्रीमद् भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरात राज्यातील वाळविहीर (ता. कपराडा, जि. वडसाड ) येथे होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील व महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह गुजरातमधील खासदार, आमदार व मंत्री तसेच महाराष्ट्रातील खासदार, आमदार व मंत्री उपस्थित राहतील.

संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

Dinkar Patil
Yeola Marathi Sahitya Sammelan: राजकारणातील खालावलेला भाषेचा स्तर चिंतेचा : कवयित्री नीरजा

संमेलनासाठी मुख्य आयोजक दिनकर पाटील, गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी, माजी आमदार बाळासाहेब सानप, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, दत्ता गायकवाड, प्रकाश ननावरे, राजेंद्र जायभावे आदींसह सर्व आयोजक प्रयत्न करत आहेत.

कार्यक्रमास साधू संत महंत तपस्विनी महानुभाव पंथाचे सर्व साधु संत, महंत तपस्विनी, वासनिक, उपदेशी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी सुमारे पाच लाख नागरिक उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गुजरात राज्यातील भडोच येथील परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचा वाडा महानुभाव पंथियांना दर्शनासाठी खुला व्हावा, अतिदुर्गम भागात पालघर, बलसाड, डांग, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी भागात महानुभाव पंथाचे हजारो बंधू-भगिनी असून, त्यांनी खूप मोठे काम उभे केले आहे.

त्यांच्या धर्मपंथ प्रचार-प्रचारासाठी बळ मिळावे, महानुभाव पंथ आणखी मोठ्या प्रमाणावर वाढावा, यासाठी गुजरातमध्ये कार्यक्रम होत आहे.

कार्यक्रमात संपूर्ण देशभरातील महानुभाव पंथाचे साधु, संत, महंत, तपस्विनी वासनिक यांनी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या कार्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. आयोजक राजेंद्र जायभावे उपस्थित होते.

Dinkar Patil
Sahitya Sammelan : मराठवाडा साहित्य संमेलनासाठी गंगापूर सज्ज; उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com