Education News : प्रवेशांपूर्वी दाखल्यांचा घोळ; सरकारी कार्यालयांत धावपळ
Students Struggle as Admission Deadlines Near : महाऑनलाइन सर्व्हर अडथळ्यांमुळे शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्र, तहसील कार्यालयांमध्ये धावपळ करताना, सुमारे ४७ हजार अर्ज रखडले.
नाशिक- महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये वारंवार अडथळे येत असल्याने शैणणिक दाखल्यांना विलंब होत आहे. त्यामुळे नूतन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ ओढवली आहे.