येवला- जुलै अर्धा संपत येत असतानाही अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. निम्मेच प्रवेश झाल्याचे दिसते. या सर्व गोंधळात काही ठिकाणी अकरावीचे वर्ग सुरू झाले; तर काही ठिकाणी अद्यापही वर्ग बंदच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने एप्रिल- मेमध्येही वर्ग सुरू राहतील, असे सांगितले जात आहे.