नाशिक- शासनस्तरावरून लाचखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असतानाही गेल्या साडेपाच महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता, लाचखोरी रोखण्यात यश आले असे म्हणता येत नाही. गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये राज्यात ५०३ लाचखोर लाचेची रक्कम घेताना सापडले आहेत.