Maharashtra's Move Towards Artificial Sand: An Overview : कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणींमुळे क्रशर चालक व अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा आहे.
नाशिक- राज्यात नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू धोरण शासनाने आणले. पण, या धोरणात अनेक त्रुटी असल्याने अंमलबजावणीवरून गौणखनिज विभागात संदिग्धता निर्माण झाली. परिणामी, दीड महिन्यापासून हे धोरण कागदावरच रखडले आहे.