नाशिक- राज्यातील आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, तसेच एक हजार १५५ कर्मचाऱ्यांनी रुजू तारीख न लिहिल्याने त्यांच्याबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांचेही वेतन लवकरच सुरू होईल, असे आश्वासन आयुक्तांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले आहे.