Ravindra Mangave
sakal
नाशिक: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. विद्यमान अध्यक्ष ललित गांधी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर घटनेनुसार वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सोमवारी (ता. २९) दुपारी मुंबई मुख्य कार्यालयात प्रभारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.