Grand Rally
sakal
सातपूर: महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार फेडरेशनचे तिसरे राज्य अधिवेशन शनिवारी (ता. १३) नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात झाले. हजारो बांधकाम कामगारांच्या भव्य पायी रॅलीने अधिवेशनाची सुरुवात झाली. ही मिरवणूक फुले मार्केट, महात्मा फुले चौक, आहेर गल्ली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांना अभिवादन करून ‘आयटीआय’मार्गे ‘सीटू’ कामगार भवन येथे दाखल झाली.