Mico Hospital: सातपूर मायको हॉस्पीटलमध्ये कुटूंबनियोजन शस्रक्रिया बंदच! कामगार महिलांची 2 वर्षांपासून गैरसोय

hospital
hospitalesakal

Maharashtra Din : महापालिकेने सुमारे पाच कोटी रूपये खर्च करून अत्याधुनिक असे सातपूरचे मायको हॉस्पीटल उभारले, पण या रूग्णालयात दोन वर्षांपासून कुटुंबनियोजनाच्या शस्रक्रिया बंद आहेत.

यामुळे परिसरातील कामगार महिला तसेच गरीब महिलांची गैरसोय होत आहे. याबाबत कामगार आयुक्तांनी लक्ष घालत सकाळ व सायंकाळची ओपिडीही सुरू करण्याची मागणी होत आहे. (Maharashtra Din Family planning surgery in Satpur mico Hospital closed 2 years of disadvantage of working women nashik news)

सातपूर औद्योगिक वसाहतीत लाखो गरीब कामगार कुटूंबाना मायको हॉस्पीटलचा मोठा आधार आहे. प्रस्तुतीसह इतर आजारांवर उपाचाराच्या सुविधा असल्याने विशेषतः महिला वर्गाची वाढती वाढल्याने तत्कालीन नगरसेवकांनी पाठपुरावा करून सुमारे पाच कोटी रूपये खर्च करून सुसज्ज पन्नासपेक्षा जास्त खाटांचे हॉस्पीटल उभारले.

त्यात सात वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहे. त्यापैकी तीन स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दंतरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ व सर्जन असा डॉक्टर आहेत.

कोरोनामुळे हॉस्पीटलमधील कुटूंबनियोजनाच्या शस्रक्रिया विभाग बंद करण्यात आला, तो आजतागायत सुरूच झालेला नाही. सात वैद्यकीय अधिकारी असूनही केवळ सकाळीच ओपीडी घेतली जाते.

दुपारी पेशंट आले तरी त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी या असे सांगून परत पाठविले जाते. वरिष्ठ अधिकारींचे दुर्लक्ष असल्याने या अत्याधुनिक रूग्णालयाची सेवा पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही. अधिकारींपैकी दोघे आज येतात,इतर बाहरेच असतात असा आरोप रूग्णांचे नातेवाईक करत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

hospital
Sinnar Market Committee Election : ‘त्या’ 8 संस्थांचा मुद्दाच सिन्नर बाजार समितीत निर्णायक! वाजे गटाला लाभ

खासगीत जाण्याची वेळ

नियमानुसार सकाळी नऊ ते एक आणि दुपारी चार ते सहा अशी दिवसातून दोनवेळा ओपीडीची वेळ आहे. पण सद्या फक्त सकाळीच ओपीडी घेतली जाते.

प्रसूतीनंतर अनेक महिला कुटूंबनियोजनाची शस्रक्रिया करण्यासाठी आग्रही असतात, मात्र सुविधा नसल्याने त्यांना नाईलाजाने खासगी रूग्णालयांत जावे लागते. याबाबत आयुक्तानी दखल घेणे गरजेचे आहे असे रूग्णांचे म्हणणे आहे.

"शासन म्हणते, हम दो हमारे दो, पण गेल्या दोन वर्षापासून मी कुटूंबनियोजनाच्या शस्रक्रियेबाबत हॉस्पीटलमध्ये विचारणा करते, पण अजून सुरू झालेले नाही असेच सांगण्यात येते. आम्ही हातावर पोट भरणाऱ्यांनी जायचं कुठे?"- सीमा अहिर, महिला, सातपूर.

hospital
Dhule Bazar Samiti Election Result : शिरपूरला अमरिशभाईंचाच करिष्मा! सर्व 18 जागांवर विजय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com