नाशिक- दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमास प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. वाढीव मुदतीनुसार सोमवार (ता. ३०)पर्यंत नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल. ७ जुलैपासून पहिल्या प्रवेश फेरी (कॅप राउंड)ची प्रक्रिया सुरू होईल.