कळवण: वनहक्क कायद्यानुसार वनहक्क पट्टेधारकांचे नाव सातबारावरील इतर अधिकारातून काढून त्यांना स्वतंत्र सातबारा देणे व शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आदिवासी विकास विभाग, महसूल व वन विभागाला दिले. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी आमदार नितीन पवार यांना पत्राद्वारे याबाबत कळविले.