Fraud
sakal
पंचवटी: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून शुल्काची रक्कम बनावट पावत्यांद्वारे घेत ती विद्यापीठाच्या बँक खात्यात जमा न करता तब्बल दीड कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बडतर्फ कक्ष अधिकारी विजय मधुकर जोंधळे यांच्यासह वरिष्ठ लिपिक सुरेंद्र मारुती रोकडे, तसेच महिला शिपायाविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.