लासलगाव- देशातील एकूण कांदा उत्पादनातील निम्मा वाटा महाराष्ट्राचा, त्यातही नाशिक जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत. उत्पादन खर्च वाढतोय, भावाची चढ-उतार सुरूच आहे आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत चालला आहे.