नामपूर- मूल्यशिक्षणामुळे व्यक्तीला चांगला नागरिक बनण्यासाठी हातभार लागतो. समाजाला एक चांगली दिशा मिळते. स्पर्धेच्या, धकाधकीच्या युगात मूल्यशिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच मूल्यशिक्षणाचे धडे देणारा ‘मूल्यवर्धन ३.०’ हा अभिनव उपक्रम अभ्यासक्रमात असेल. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक कोटीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ होईल.