नाशिक- राज्यभरात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिकृत प्रणाली लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच घेतला आहे. याअंतर्गत अंदाजे २० लाख विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध असताना, तीन दिवसांत केवळ सहा लाख दहा हजार ५५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या अल्प प्रतिसादामुळे शिक्षण विभागाची चिंता वाढली असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.