नाशिक- राज्यात मेपासून सुरू झालेल्या पावसाने जून आणि जुलै महिन्यांतही जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामात आत्तापर्यंत ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने ८७ टक्क्यांसह आघाडी घेतली असून कोकण विभाग २४ टक्क्यांवर पिछाडीवर आहे.