नाशिक: ‘‘राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होईल. या निवडणुका विविध टप्प्यांत होणार असून जानेवारीच्या मध्यापर्यंत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल,’’ अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निकालामुळे नवीन प्रभागरचनेनुसार निवडणुका होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.