Industrial Power
sakal
नाशिक रोड: राज्यातील सुमारे चार लाख ४८ हजार लघुदाब व उच्चदाब औद्योगिक वीजग्राहकांना महावितरणकडून जागतिक दर्जाची, तत्पर व पारदर्शक वीजसेवा मिळू लागली असून यामध्ये ऑनलाइन ‘स्वागत सेल’ पोर्टल निर्णायक ठरत आहे. या पोर्टलमुळे उद्योगांच्या वाढीव वीजभाराच्या मागण्या, नवीन वीजजोडण्या तसेच विविध तक्रारींच्या निराकरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे.