नाशिक- अकरावीच्या पहिल्या प्रवेशफेरीची बहुप्रतीक्षित निवड यादी गुरुवारी (ता.२६) प्रसिद्ध होणार आहे. यंदा प्रथमच शहराबरोबर ग्रामीण भागातील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने कट-ऑफ किती लागेल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. नाशिक विभागातून एक लाख ३० हजार ९७२, तर जिल्ह्यातून ६० हजार ६८१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.