Nashik Flood : पुराने पुस्तके भिजवली... पण, लक्ष्मीची स्वप्ने नाहीत! संकटातही शिक्षणाची आस जपणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे हृदयस्पर्शी चित्र

Nashik flood affected student story : नाशिकच्या सायखेड्यातील चौथीतील विद्यार्थिनी लक्ष्मी राजभाटे पुरात भिजलेल्या पुस्तकांना वाळवत शिक्षणाची जिद्द जपत आहे. तिची प्रेरणादायी धडपड पुरग्रस्त विद्यार्थ्यांच्या वास्तवाचे हृदयस्पर्शी चित्र उभे करते.
Saikheda schoolgirl story

Saikheda schoolgirl story

esakal

Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : महापुराच्या पाण्याने अनेकांची घरे, संसार आणि आयुष्याची घडी विस्कटली. घरातील धान्य, कपडे, संसारोपयोगी वस्तूंसह विद्यार्थ्यांची पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्यही चिखलमय पाण्यात भिजून गेले. या नुकसानीतून सावरण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतानाच सायखेडा येथील एका चिमुरडीने दिलेला शिक्षणप्रेमाचा संदेश अनेकांच्या मनाला चटका लावून (Saikheda girl drying soaked school books) गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com