MSME
sakal
नाशिक: महाराष्ट्रामधील एमएसएमई औद्योगिक क्षेत्र हे भारताच्या यशोगाथेला आकार देण्यात आघाडीवर आहे. सीआयआयने आयोजित केलेल्या परिषदेमधून एमएसएमईना नवोपक्रम देण्यासह स्पर्धात्मक व समृद्ध तसेच स्वावलंबी भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे कौतुकोद्गार राज्याच्या उद्योग विभागाच्या विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शुक्रवारी (ता. १९) येथे काढले.