Protest
sakal
नामपूर: गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने कांद्याच्या दराबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली येत्या शुक्रवारी (ता. १२) राज्यव्यापी ‘फोन आंदोलन’ करण्यात येणार आहे. संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अभिमन पगार, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी ही माहिती दिली.