नाशिक- रूपेरी पडद्यावरचा ‘सिक्स पॅक’ अन् ‘फिट बॉडी’ असलेला पोलिस पाहून खऱ्याखुऱ्या पोलिसांमध्ये ‘सिक्स पॅक’ बॉडीची क्रेझ आहे. परंतु १९८५ पासून दिला जाणारा २५० रुपयांचा तंदुरुस्त भत्ता आजही तोच असून, बाजारात सुकामेव्याचे दर हजार रुपयांपलीकडे गेले आहेत. त्यामुळे पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त चाचणीकडे पाठ फिरविली असून, मैदानी व्यायाम करून काहीजण आपली तंदुरुस्ती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरीही बहुतांश पोलिसांना शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.