Sanjay Shirsat : "अजित पवारांच्या निधनाची सीबीआय चौकशी करा!"; मंत्री संजय शिरसाठ यांची मोठी मागणी

Sanjay Shirsat Demands High-Level Probe into Ajit Pawar’s Death : चांदवड येथे पंचकल्याण सोहळ्यासाठी जात असताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे स्वागत करण्यात आले; यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार यांच्या निधनाबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat

sakal 

Updated on

येवला: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पूर्ण महाराष्ट्राला नाही, तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केल्या. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. सरकार प्रयत्न करत आहे. पण रोज नवीन पुरावे येत असतील, तर दखल घेतली पाहिजे. रोहित पवारांची मांडणी व आरोप केले, त्याची त्यात शंका घेण्याचे कारण आहे. त्याची सीबीआय किवा इतर संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com