नाशिक- जिल्ह्यात दोन आठवड्यांच्या ओढीनंतर पुन्हा एकदा पावसाचे दमदार आगमन झाले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पश्चिम पट्ट्यातील धरणांचा साठा १०० टक्क्यांच्या आसपास पोहोचत आहे; तर कमी पावसाच्या पूर्व पट्ट्यातही पावसामुळे दुबार पेरण्याचे संकट दूर होत आहे. नांदगावसह अनेक तालुक्यांत तीन आठवड्यांच्या मोठ्या ओढीने शेतकऱ्यांत चिंता होती. मात्र, अनेक भागांत पावसाने दिलासा मिळतो आहे.