Nashik News : रेशन दुकानदारांना दिलासा; राज्य सरकारकडून कमिशनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ
Maharashtra government increases ration shop commission : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवले; क्विंटलमागे आता १७० रुपये मिळणार असून नाशिकसह राज्यभरातील ५१ हजार दुकानदारांना फायदा होणार आहे.
नाशिक: राज्य शासनाने रेशन दुकानदारांना क्विंटलमागे वाढीव २० रुपये कमिशन लागू केले आहे. या निर्णयामुळे यापुढे प्रतिक्विंटलला १७० रुपये कमिशन मिळणार आहे. राज्यभरातील साधारणत: ५१ हजार रेशन दुकानदारांना या निर्णयामुळे फायदा होईल.