RTO
sakal
पंचवटी: मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेच्या सहा वर्षांच्या संघर्षानंतर २३ सप्टेंबर २०२२ ला मंजूर झालेल्या नवीन आकृतिबंधाची अंमलबजावणी दोन वर्षांचा कालावधी उलटूनही झालेली नाही. या विलंबामुळे राज्यातील आरटीओ कर्मचारी वर्ग संतप्त झाला असून, प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.