नाशिक: मणिपूर, हरियानासारख्या राज्यांचा दौरा करून तेथील पायाभूत सुविधा, शासनाच्या योजनांची माहिती घेणार आहे. यानंतर येत्या दोन ते चार महिन्यांत राज्याचे क्रीडा धोरण जाहीर केले जाईल. आगामी काळात खेळाडूंना सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी निवासी क्रीडा संस्था सुरू केली जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी रविवारी (ता. ३१) येथे केली.