Center Head Recruitment
sakal
नामपूर: राज्यात काही वर्षांपासून केंद्रप्रमुखांची शेकडो पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागातील प्रशासकीय यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरळ सेवा भरतीद्वारा केंद्रप्रमुखांची पदे भरण्याचा निर्णय शासनाने २०१३ मध्ये घेतला होता. त्यानंतर न्यायालयीन याचिकांमुळे अनेक वर्ष भरतीला मुहूर्त लागला नाही.