Student Verification
sakal
नामपूर: राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवून शासनाचे अनुदान लाटले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची पटपडताळणी होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा १५ डिसेंबरपर्यंत एकाचवेळी विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात येणार आहे. हा दिवस अद्याप निश्चित झालेला नाही.