Teacher Eligibility Test
sakal
नामपूर: सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक केली आहे. त्यानुसार ज्या शिक्षकांचे वय ५२ वर्षांपेक्षा कमी आहे, त्या सर्वांनाच आता ‘टीईटी’ परीक्षा द्यावी लागणार आहे. या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘टीईटी’साठी राज्यभरातील हजारो शिक्षक आतापासूनच अभ्यासाला लागले आहेत.