नाशिक: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) २०२५ चा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला आहे. लॉगइनद्वारे गुणपत्रक उपलब्ध करून दिले होते. सायंकाळी उशिरा पात्रतेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित यादी प्रसिद्ध झाली होती. यात दोन लाख चार हजार ९८८ उमेदवारांच्या नावाचा समावेश होता.