नाशिक: उत्तराखंडच्या डोंगराळ भागात काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या भूस्खलन आणि पुरामुळे प्रवासाला गेलेले महाराष्ट्रातील १७२ पर्यटक भीषण संकटात सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपासून सतत पर्वतीय भागात फिरत, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाशी थेट संवाद साधत, त्यांनी सर्वांना सुरक्षित स्थळी आणण्याची जबाबदारी निभावली.