कळवण- आदिवासी विकास विभागाने शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये बाह्यस्त्रोताव्दारे १७९१ शिक्षकांची पदभरती करण्याचा २१ मे २०२५ रोजीचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोध करत, यापूर्वी एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे कार्यरत असलेल्या १७९१ शिक्षकांना कायम करण्यात यावे, अशी ठाम मागणी राज्य जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य व आमदार नितीन पवार यांनी केली आहे.