लासलगाव- बांगलादेशाने आपल्या सीमा व्यापाऱ्यांसाठी बंद केल्याने नाशिकमधील कांदा निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे. याचा थेट फटका लासलगाव, पिंपळगाव, निफाड या प्रमुख बाजार समित्यांमधून होणाऱ्या कांदा व्यवहाराला बसला. येथील बाजार समितीत गत आठवड्यापर्यंत २५०० ते ३२०० रुपयांनी विकला जाणारा कांदा निर्यात बंद झाल्याने थेट १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे.