नाशिक- शासनाच्या अंत्योदय साडी वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक महिलांना साड्यांची भेट देण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत एक लाख ५२ हजार ९१० साड्यांचे वितरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असून, ही एकूण उद्दिष्टाच्या ८६.३४ टक्के वाटपाची नोंद आहे.