नाशिक- लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांना देण्यात आला असून, हा घोटाळा थेट अर्थखात्यातून झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपयांची लूट झाली असून, या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून अर्थमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली.