सिडको- प्रेम आंधळं असतं, असं म्हणतात ते खरे ठरतंय. अभियांत्रिकी शिकणाऱ्या तरुणीच्या प्रेमात धुंद झालेल्या एका तरुणाने तिचा विश्वासघात करीत तिला एकटे सोडून पळ काढल्याची घटना समोर आली. मागील सहा दिवस हे दोघं मुंबई-आग्रा महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. प्रेम, मौजमजा आणि भविष्यासाठी स्वप्नं रंगविणारी ही जोडी अचानक भांडण किंवा त्रासामुळे नव्हे, तर प्रियकराच्या चलाखीमुळे एका अनपेक्षित वळणावर आली.