नामपूर ता. १९ : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता विभागाने तयार केलेल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात, ‘पीपीपी’ धोरण कामगारांसाठी वरदान ठरणार आहे.