Nashik Politics : पाच मंत्र्यांचा पेच आणि निधी वाटपाची गोंधळलेली वाट
Political Deadlock Delays Nashik's Development : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीअभावी नाशिक जिल्ह्यातील विकासकामे रखडली असून, पाच मंत्र्यांमधील रस्सीखेच प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे
नाशिक- पालकमंत्र्यांअभावी यंदा जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसली असतानाच पाच मंत्र्यांमुळे निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निधी वाटपाची ही कोंडी कशी फोडायची या विवंचनेत अधिकारी सापडले आहेत.