नाशिक- कोरोना महामारीच्या काळात दुर्बलांना मदत मिळवून देताना अशिक्षित असल्याने उद्भवलेल्या अडचणी अन् त्यातून जिद्दीने पेटत तब्बल तेरा वर्षांच्या खंडानंतर दहावीच्या परीक्षेचा केलेला सामना, या परीक्षेत यशस्वी होताना गाठलेले यशोशिखर... हा प्रेरणादायी प्रवास आहे, नेहा पगारे यांचा. आज त्या गंजमाळ परिसरातील भीमवाडीतील मुला-मुलींनाही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.