नाशिक- राज्यातील पोलिस उपायुक्त व अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी गृह विभागामार्फत ५२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांची नियुक्ती झाली आहे.