नाशिक- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून विद्यमान महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिवसेनेत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यावर शिवसेना (उबाठा) पक्षातून त्यांची आज हकालपट्टी करण्यात आल्याचे मध्यवर्ती कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या जागी महानगरप्रमुख म्हणून श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.